Fill out this form

Nagpur Mission Cancer : एक रुपया दान, कॅंसर मुक्त अभियान, देवता लाईफ फाउंडेशनचं 15 ॲागस्टपर्यंत अभियान

Posted on : Jul 25, 2022

देवता लाईफ फाउंडेशन गेल्या सात वर्षांपासून कँसर पीडितांसाठी काम करते. या फाउंडेशनच्या माध्यमातून कँसर पीडितांसाठी विविध उपक्रम राबविले जातात.

Nagpur Mission Cancer : एक रुपया दान, कॅंसर मुक्त अभियान, देवता लाईफ फाउंडेशनचं 15 ॲागस्टपर्यंत अभियान

देवता लाईफ फाउंडेशनचं 15 ॲागस्टपर्यंत अभियान

नागपूर : कॅंसर रुग्णांवरील उपचारासाठी समाजाने पुढे यावं, याच उद्देशानं देवता लाईफ फाउंडेशनकडून (Devta Life Foundation), रस्त्यावर, नागपूर मेट्रो, राजकीय नेते, शाळा, कॅालेजमध्ये जाऊन एक रुपया दान, कॅंसर मुक्त अभियान राबवलं जातंय. भर पावसात देवता फाउंडेशनचे स्वंयसेवक (Volunteer) जाऊन कॅंसरग्रस्तांसाठी एक रुपया दान मागतायत. देवता फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर बावणे (Kishore Bavane) यांच्या पुढाकाराने देवता लाईफ फाउंडेशननं एक रुपया दान, कॅंसर मुक्त अभियान सुरु केलंय. 15 ॲागस्टपर्यंत हे अभियान राबवून कॅंसरग्रस्तांना मदत गोळा केली जाणार आहे. कँसरपीडित मुलाच्या आर्थिक मदतीसाठी केवळ एक रुपया देऊन कँसरमुक्त अभियानाला सहकार्य करावे, असे आवाहन देवता लाईफ फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

महिनाभर चालणार उपक्रम

देवता लाईफ फाउंडेशन गेल्या सात वर्षांपासून कँसर पीडितांसाठी काम करते. या फाउंडेशनच्या माध्यमातून कँसर पीडितांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमाची सुरुवात 15 जुलै रोजी करण्यात आली. 15 ऑगस्टपर्यंत हा उपक्रम राबविला जाणार आहे. कँसर पीडित मुलांच्या औषध व इतर खर्चावर योगदान मिळण्यासाठी याची मदत होते. नागपूर मेट्रो, शाळा, कॉलेज, महाविद्यालय याठिकाणी जाऊन एक रुपया गोळा केला जाणार आहे. सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एक रुपया द्या, सहकार्य करा

कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूर नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष संजय भेंडे यांच्या हस्ते झाले. यावेळी कँसर हॉस्पिटलचे संचालक डॉ. करतार सिंग, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अथुल सबनीस उपस्थित होते. उद् घाटनानंतर संस्थेतर्फे कँसरग्रस्त असलेलं नवीन मूल दत्तक घेण्यात आले. संस्थेला देणगी व सर्वोतोपरी मदत करणारे नामदेवराव नाचनकर व गजानन उमाटे यांचा सत्कार करण्यात आला. कँसरपीडित मुलाच्या आर्थिक मदतीसाठी केवळ एक रुपया देऊन कँसरमुक्त अभियानाला सहकार्य करावे, असे आवाहन संस्थेच्या विश्वस्त नीलिमा बावणे, सारिका पेंडसे, प्रतापराव हिराणी, नरेंद्र सतीजा, संस्थेच सर्व देतवूद तसेच दी धरमपेठ महिला संस्थेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केले आहे.

Become a volunteer

Join us for a better life and beautiful future

Potential volunteers are invited to fill out an application form providing basic contact details. The benefits of volunteering include joining a dedicated community and spreading awareness of the foundation's causes.